सिल्लोड, (प्रतिनिधी) : माणिकनगर (भवन) ता. सिल्लोड येथील श्री. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कलावतीबाई माणिकराव बोराडे यांचे निधन झाले असून त्यांच्यावर आज रविवारी पूर्णा नदीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
माणिकनगर (भवन) स्मशान भूमीच्या आजूबाजूला अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अंतरावर नागरिकांनां ऐन उन्हाळ्यात उन्हात उभे राहावे लागते म्हणून बोराडे परिवार मित्र मंडळ आणि वृक्षवल्ली टीम सिल्लोडच्या वतीने पूर्णा नदीच्या काठच्या स्मशानभूमी परिसरात आज मंगळवारी सकाळी खड्डा खोदून त्याठिकाणी कलावतीबाई बोराडे यांची कायम आठवण राहण्यासाठी बोराडे परिवारातील, कुटुंबातील सदस्यांनी, मुलांनी रक्षा विसर्जन करून त्यावर जांभळीचे
झाड लावण्यात आले.
यावेळी सुनिल बोराडे संतोष बोराडे, मनिषा बोराडे, रघुनाथ बोराडे, शारदा राऊत, शिवप्रसाद राऊत, कल्याणी बोराडे, अरुण दानकर, वैभव प्रशाद, गणेश काकडे, गणेश जाधव, आपार, सुनिता जाधव, नंदा पांडव, डॉ. विशाल आकाते, डॉ. संतोष शिंदे, डॉ. बाबासाहेब जाधव, डिगांबर मगर, कडुबा सपकाळ, अंकुश थोरात, राजेंद्र काळे, सोमीनाथ कोलते, ज्ञानेश्वर वखरे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण फाळके, शिवप्रसाद राऊत, यादवराव पांढरे, संजय काळे, किशोर बोराडे यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी, संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर चे संचालक, नाभिक समाज, आप्तेष्ट, वृक्षवल्ली टीम आणि बोराडे परिवार मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.















